Saturday 23 September 2017

बस्स नाम ही काफी है !

..... आणि खुप दिवसांची ईच्छा पूर्ण झाली. मी देखील "ब्लॉगर बाई" झाले. पहिल्याच ब्लॉग मध्ये जम्मू-काश्मीर सारखा ज्वलंत विषय मांडला. प्रतिक्रियांचा काही पाऊस वैगेरे पडला नाही. थोडक्याच पण त्या प्रेरणा देणाऱ्या होत्या. पण बऱ्याच जणांच्या कुतूहलाचा (काही प्रमाणात रोषाचा देखील बरं का..) विषय होता "मुक्ताफळ..?"
                       खरं तर खुप जणांनी 'एवढ छान लिहतेस पण नाव का असं ठेवलंय मुक्ताफळ ?' असा आक्षेपच घेतला. (धक्काच बसला ऐकून कारण मला तर माझ्या ब्लॉग पेक्षा हे माझ नवीन नावच जास्त आवडलेलं.)मग काय हा आक्षेप चांगलाच जिव्हारी लागलेल्या मुक्ताबाईंनी सुरू केली मुक्ताफळ या शब्दाच्या अर्थाची शोधमोहीम..!
              म्हणा त्यांच काही चुकीच नव्हत. एखाद्याने विसंगत प्रतिक्रिया दिल्यावर आपण "काय मुक्ताफळं उधळलीस" असं फटकारतो.  या शोधमोहिमेत गुगल ने एक सुखद धक्का दिला. गुगलच्या मते 'मुक्ताफळ म्हणजे मोती' आहा.. किती भारी वाटल सांगू.. अगदी हजारो शिंपले उघडल्यानंतरचा तो एखादाच मोती मला सापडल्यासारखं... काही रसिकांच्या मते मुक्ताफळ म्हणजे बुरसटलेल्या विचारांवर केलेलं तार्किक भाष्य. निर्भीडपणे व्यक्त होणे म्हणजे मुक्ताफळ. मनात संकोच न बाळगता आपला विचार मांडणे म्हणजे मुक्ताफळ. आपणच आपल्या मनाला घातलेल्या या चौकटीच्या बाहेर डोकवून पहा तर.. गमावल्या पेक्षा काही तरी कमवल्याचाच अनुभव येईल. या शब्दाचा व्यापक अर्थ समजून प्रत्येकानीच नव्या विचारांची मुक्ताफळं उधळायला हवीत.
              महान सहित्यिक विल्यम शेक्सपियर ने म्हणलं आहे "नावात काय आहे?" पण या शब्दाच्या अर्थांच्या ईतक्या विविध छटा पाहून "बस्स नाम ही काफी है !" असं म्हणायला हरकत नाही.

-मुक्ताफळ 
(कु.मुक्ता भारत शिंदे.)

Friday 15 September 2017

उध्वस्त मनांच्या , उत्तुंग आशा

"जम्मू-काश्मीर" हे नाव ऐकताच प्रत्येक भारतीयाच्या डोळ्यासमोर येतात सीमेवरील जवान आणि सीमेपलीकडून होणारा बेछुट गोळीबार(अर्थातच या सीमेपलीकडच्याचे नाव सांगण्याची गरज नाही.)एखादा राजकीय प्रश्न चूकांवर चूकांचा डोंगर करून उभा राहतो. किती गुंतागुंतीचा करून ठेवता येतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे काश्मीर होय. गुंता सोडवावा म्हणून योजलेला प्रामाणिक उपाय सुध्दा गुंता वाढवण्यास कारण ठरत गेला ही या प्रश्नाची खरी शोकांतिका.. १५ऑगस्ट १९४७ रोजी ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून भारत स्वतंत्र झाला. ब्रिटिश भारतातून निघून गेले खरे पण त्यांनी देशाची तीन भागात विभागणी केली. भारत, पाकिस्तान व संस्थाने. भारतीय नेत्यांनी गोडीगुलाबीने या संस्थानांचे विलिनीकरण भारतात करून घेतले. भारत-पाक फाळणी झाली तेव्हा जम्मू-काश्मीर देखील एक स्वतंत्र संस्थानच होते. पुढे पाक पुरस्कृत टोळीवाल्यांनी काश्मीरमध्ये घुसखोरी केल्यामुळे बचावासाठी काश्मीरचे राजे हरिसिंह यांनी भारताकडे मदत मागितली व काश्मीरचे भारतात विलिनीकरण केले. यावेळेस राजा हरिसिंह यांनी भारताबरोबर केलेल्या करारामध्ये काश्मीरचे कायदे बदलू नयेत व नवीन कायदे तयार करताना काश्मीर सरकारची संमंती आवश्यक आहे. अशी बंधने समाविष्ट केली. या बंधनांच्या पूर्तिसाठी भारतीय राज्यघटनेत ३७०वे कलम अस्तित्वात आले. आणि तेथूनच सुरू झाली अलगतेची भावना. व्यक्तिच्या किंवा देशाच्या आयुष्यात एक असा टप्पा येतो की, यावेळेस व्यक्तिला भेडसावणाऱ्या समस्येचा मुळांपासून विचार करून मार्ग शोधावा लागतो. आज आपण काश्मीरबाबत याच टप्प्यावर येऊन पोहचलो आहोत. काश्मीर समस्येवर तोडगा काढण्यासाठी सुनियोजीत आराखड्याबरोबरच तत्काळ कृतीची देखील गरज आहे. काश्मीरच्या विकास प्रक्रियेतील सर्व भागीदारक घटकांना एकत्र करून एका ठोस उपाययोजनेवर शिक्का मोर्तब करणे ही काश्मिरी जनतेच्या हिताची गोष्ट ठरेल. कश्मीरी जनतेला मुख्य प्रवाहात आणणे. सध्याच्या घडीला आवश्यक आहे. येथील तरुणांची माथी भडकवणाऱ्या फुटीरतावादयांचा योग्य तो बंदोबस्त आता करायलाच हवा. आप्सा या कायद्याबद्द्ल कमालीचा असंतोष आहे.तो रोष कमी करण्यासाठी सकारात्मक प्रयत्न करायला हवेत. जम्मू-काश्मीर आणि लडाख या तीनही विभागांची भौगोलिक परिस्थिती लक्षात घेऊन तेथील हवामानाला अनुसरून तेथे उद्योगधंदे उभारायला हवेत. जेणेकरून तरुणांना रोजगार उपलब्ध होईल. हे ही सत्य आहे की हे बदल तत्काळ घडून येणार नाहीत. ती एक दिर्घकालीन प्रक्रिया आहे. आज माझ्यासारख्या प्रत्येक भारतीयाच स्वप्न आहे की, हे धगधगत नंदनवन पुन्हा एकदा सुखाने आणि शांततेने नांदावे. तेव्हा त्या  चारी बाजूला नजर जाईल तेथे दिसणाऱ्या पांढऱ्या शुभ्र बर्फाकडे पाहून प्रत्येक भारतीयच मन म्हणेल "जर धरतीवर कुठे स्वर्ग असेल तर ईथेच हो हो ईथेच.." -मुक्ताफळ (कु. मुक्ता भारत शिंदे.)

जुनं ते सोनं : इतिहासाचा मौल्यवान खजिना

            काल बाथरूममधून पाणी पुढे जात नव्हतं. पाणी कुठे तरी chock up झालं असणार.. ड्रेनेज क्लीनिंग पावडर टाकून वैगेरे हा प्रश्न सुटेल असं...