Saturday, 23 September 2017

बस्स नाम ही काफी है !

..... आणि खुप दिवसांची ईच्छा पूर्ण झाली. मी देखील "ब्लॉगर बाई" झाले. पहिल्याच ब्लॉग मध्ये जम्मू-काश्मीर सारखा ज्वलंत विषय मांडला. प्रतिक्रियांचा काही पाऊस वैगेरे पडला नाही. थोडक्याच पण त्या प्रेरणा देणाऱ्या होत्या. पण बऱ्याच जणांच्या कुतूहलाचा (काही प्रमाणात रोषाचा देखील बरं का..) विषय होता "मुक्ताफळ..?"
                       खरं तर खुप जणांनी 'एवढ छान लिहतेस पण नाव का असं ठेवलंय मुक्ताफळ ?' असा आक्षेपच घेतला. (धक्काच बसला ऐकून कारण मला तर माझ्या ब्लॉग पेक्षा हे माझ नवीन नावच जास्त आवडलेलं.)मग काय हा आक्षेप चांगलाच जिव्हारी लागलेल्या मुक्ताबाईंनी सुरू केली मुक्ताफळ या शब्दाच्या अर्थाची शोधमोहीम..!
              म्हणा त्यांच काही चुकीच नव्हत. एखाद्याने विसंगत प्रतिक्रिया दिल्यावर आपण "काय मुक्ताफळं उधळलीस" असं फटकारतो.  या शोधमोहिमेत गुगल ने एक सुखद धक्का दिला. गुगलच्या मते 'मुक्ताफळ म्हणजे मोती' आहा.. किती भारी वाटल सांगू.. अगदी हजारो शिंपले उघडल्यानंतरचा तो एखादाच मोती मला सापडल्यासारखं... काही रसिकांच्या मते मुक्ताफळ म्हणजे बुरसटलेल्या विचारांवर केलेलं तार्किक भाष्य. निर्भीडपणे व्यक्त होणे म्हणजे मुक्ताफळ. मनात संकोच न बाळगता आपला विचार मांडणे म्हणजे मुक्ताफळ. आपणच आपल्या मनाला घातलेल्या या चौकटीच्या बाहेर डोकवून पहा तर.. गमावल्या पेक्षा काही तरी कमवल्याचाच अनुभव येईल. या शब्दाचा व्यापक अर्थ समजून प्रत्येकानीच नव्या विचारांची मुक्ताफळं उधळायला हवीत.
              महान सहित्यिक विल्यम शेक्सपियर ने म्हणलं आहे "नावात काय आहे?" पण या शब्दाच्या अर्थांच्या ईतक्या विविध छटा पाहून "बस्स नाम ही काफी है !" असं म्हणायला हरकत नाही.

-मुक्ताफळ 
(कु.मुक्ता भारत शिंदे.)

4 comments:

  1. Great keep it up & best of luck

    ReplyDelete
  2. मुक्ताफळ म्हणजे मोती नसून फक्त मुक्ता म्हणजे मोती असं आहे.

    ReplyDelete

जुनं ते सोनं : इतिहासाचा मौल्यवान खजिना

            काल बाथरूममधून पाणी पुढे जात नव्हतं. पाणी कुठे तरी chock up झालं असणार.. ड्रेनेज क्लीनिंग पावडर टाकून वैगेरे हा प्रश्न सुटेल असं...